

✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 📲9423170716
प. पु. समर्थ सद्गुरू श्री. गजानंद माऊली क्षेत्र श्री. श्री. महर्षी मातंग ऋषी आश्रम, श्री महाकाली संस्थान, नंदनलाल गौरक्षण कासोळा (देव)येथे दि.१५डिसेंबर२०२४ रोजी भव्य संत संमेलन व निशुल्क भव्य रोगनिदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमंत्रणानिमित्य गावास भेटी देण्याची सुरुवात त्यांनी पुसद तालुक्यातील मांडवा गावापासून केली. ✒️* सिद्धार्थ कदम पुसद तालुका प्रतिनिधी ✒️*सर्व ग्रामस्थांच्या वतीने माऊलींच्या आगमनानिमित्त गावातील प्रमुख मार्गाने रांगोळी काढून, दिवे प्रज्वलित करून, पुष्प वाहून, वाजत – गाजत लोकशाहिर, साहित्यसम्राट, डॉ. अण्णाभाऊ साठे चौक येथे आणण्यात आले व शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच इतर पाहुणे मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माऊलीने ग्रामस्थांना, शिक्षण, आरोग्य, निर्व्यसनी, रोजगार, या सर्व महत्वाच्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.आयोजित भव्य संत संमेलन व निशुल्क रोगनिदान उपचार शिबीराकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप आडे यांनी केले तर आभार बजरंग राठोड यांनी मानले.यावेळी गावातील सर्व प्रतिष्टीत नागरिक, महिला मंडळी, व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post