मिरजेतील मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर मिरज सुधार समितीने मिशन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि किल्ला भागातील बहुचर्चित सुसज्जभाजी मंडई साठी जोरदार पाठपुरावा करण्याचे ठरवले असल्याची माहिती समिती चे ऍड ए ए काझी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले ते म्हणाले मिरजेतील नागरिकांच्या प्रश्नांसाठी समिती कटीबध्द आहे. आज पर्यंत मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून आक्रमकपणे आम्ही प्रशासनाच्या समोर ठाम उभे राहिलो प्रसंगी सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी दोन हात केले. विविध प्रकारच्या सनदशीर आंदोलनाने प्रशासनावर दबाव आणला आज रस्त्यावर स्ट्रीट लाईट उभे राहिले. मिरजेला जशी संगीताची मोठी परंपरा आहे तशी बुटबॉल चीही आहे. आजमितीस कित्तेक फुटबॉल पटू या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाने घडवले आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधींचा निधी खर्चूनही हे क्रीडांगण बकाल राहिले. त्याचप्रमाणे भाजी मंडई ची अवस्था काही वेगळी नाही. किल्ला भागातील खंदकामध्ये सुसज्ज भाजी मंडई चे स्वप्न लोकप्रतिनिधी नि दाखवले खरे मात्र महापालिकेच्या कारभारामुळे काम ठप्पच आहे. जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी प्रशासन करत आहे. तत्कालीन मंत्री महोदयांनी थाटामाटात या भाजी मंडई चा नारळ फोडला माजी महापौर संगीता खोत यांनी मिरज कर नागरिकांचे आज स्वप्न साकार होत असल्याच्या वल्गना केल्या मात्र अजूनही नागरिकांना या इमारतीमधून भाजी पाला काही विकत घेण्याचा योग येईना. मात्र आता या दोनही ठिकाणच्या विकासासाठी आणि उभारणीसाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असेही ऍड काझी यांनी नमूद केले. यावेळी समितीचे शंकर तात्या परदेशी अध्यक्ष असिफ निपाणीकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post