सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका अस्तित्वात आल्यापासून मिरज आणि कुपवाड शी दोन शहरे सांगलीच्या मानाने दुर्लक्षित समजली जातात. स्वच्छतेच्या बाबतीत तर सांगली मध्ये नेहमी स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर स्वच्छता करताना दिसून येतात मात्र मिरज आणि कुपवाड शहर परिसरात मात्र अजूनही ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत तर कंटेनर मधून कचरा ओसंडून वाहताना दिसून येतो. मिरज विभागीय कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या उपायुक्त विजया यादव यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असताना त्यांनी मिरजेतील स्वच्छता मोहीम आता अधिक तीव्र करणार असून येणाऱ्या काही काळात तुम्हाला मिरज हे स्वच्छ आणि चकचकीत दिसेल अशी ग्वाही त्यांनी दिली मात्र आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी हि प्रत्येक नागरिकांची आहे. पूर्णतः प्रशासनावर अवलंबून राहणे बरोबर नाही तर आपल्या घरातील कचरा हा घंटा गाड्यामध्ये टाकावा इतरत्र सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. आयुक्त शुभम गुप्ता यांनी नुकतीच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत मिरजेतील प्रभागांची माहिती मी घेत असून लवकरच शहरांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम मी राबवणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मिरजेतील आरोग्य विभाग आता बदल्यांमुळे रिचार्ज झाला आहे. यापुढे स्वच्छता कर्मचारी हे आपले काम वेळेवर करतीलच मात्र मी स्वतः आता मिरजेच्या स्वच्छतेच्या बाबतीत लक्ष घालणार आहे असेही त्यांनी सांगितले.
Discussion about this post