नारायणगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने रौप्य महोत्सवी प्रसंगी राम दळवी यांना जीवनगौरव तर राजश्री बोरकर यांना समाजभूषण पुरस्कार राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते व औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मेधा सुभाष राठोड या विद्यार्थिनीस नर्सिंगच्या शिक्षणासाठी १० हजारांचा चेक देण्यात आला.
याप्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक गांधी, उद्योजक सुरेश व-हाडी , सुभाष संकलेचा , सुनील भुजबळ, प्रशांत शहा, नरेंद्र खिंवसरा, देविदास ताजवे, विलास भन्साळी, श्रीकांत फुलसुंदर, गजानन श्रीवत, संपत शिंदे, ज्ञानेश्वर लोखंडे , अक्षय मिंडे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर डहाळे, डॉ. लहू गायकवाड, गणेश चव्हाण, नरेंद्र गोसावी, सचिन कांकरिया, सतीश कोल्हे, सहयाद्री भिसे, मंगेश रत्नाकर, नारायण सुळे, शशिकांत लोढा उपस्थित होते. अशोक गांधी म्हणाले की लोकसेवा प्रतिष्ठान राजकारण न करता लोकसेवा करण्याच्या उद्देशाने १९९९ मध्ये स्थापन झाले. लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करताना मनाला समाधान वाटणे म्हणजेच समाजसेवा त्या माध्यमातून मागील २५ वर्षात समाजातील अनेक गरजवंतांना मदत केली आहे.
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कुपोषित बालकांना पौष्टिक आहार माळीन दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना पाणी व अन्नाचे वाटप, रुग्णांना आर्थिक मदत, अपंग व्यक्तींना व विद्यार्थिनींना सायकल वाटप चिपळूण येथे महापूर आल्यानंतर पूरग्रस्तांना ७०० साड्या व ३०० गणवेशांचे वाटप, ग्रंथालयासाठी पुस्तके, ऊस कामगारांना ब्लँकेट सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना जेवणाचे डब्बे आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या सुरेश व-हाडी यांनी पिंपळगाव येथील दोन जळीत कुटुंबाला ब्लँकेट बेडसीट व संसार उपयोगी वस्तू दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
Discussion about this post