तुमसर:–शहरातील माता टेकडी परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्यांची अल्पवयीन मुलगी ही “गोपी किशन अग्रवाल शाळा, तुमसर येथे जात आहे” असे सांगून घराबाहेर पडली. मात्र ती घरी परतली नाही.फिर्यादीने परिसर व नातेवाईकांमध्ये शोध घेतला परंतु त्या अल्पवयीन मुलीचा
कुठेही शोध लागला नाही. अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.संबंधित प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०१/२४, भारतीय दंड संहिता कलम १३७(२) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सपोनी घोडेस्वार करीत आहेत.
Discussion about this post