तुमसर:-
गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरी गावाजवळील बावनथडी नदीतून अवैध रेती उत्खनन प्रकरण८ डिसेंबर रोजी उघडकीस आले. गोबरवाही पोलिसांनी कारवाई करत दोन ट्रॅक्टर आणि रेतीसह ६.१० लाख रुपयांचा माल जप्त केला असून, संबंधित दोन आरोपींविरोधात पोलीसात गुन्हा नोंदवला आहे.
सदर प्रकरणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार गौरीशंकर कडव आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाथरी गावाजवळ ८.३० वाजता कारवाई केली. यावेळी स्वराज कंपनीचे दोन ट्रॅक्टर (क्रमांक एम एच ३६ ए.एल १९२९ व एम एच MH ३६ एल १३७५ ) रेतीने भरलेल्या स्थितीत आढळून आले.चालकांची चौकशी केली असता, महेंद्र हरीचंद कापगते (वय ३७ रा. पाथरी) आणि अनिल हिरालाल गहाणे (वय ३६, रा. पाथरी) यांनी रेती चोरी केल्याचे कबूल केले. दोघेही ट्रॅक्टरचे मालक असल्याची माहिती आहे. आरोपींनी कोणताही अधिकृत परवाना किंवा शासन मान्यतापत्र न घेता, नदीतील रेती चोरून गावातील लोकांना विक्री केल्याचे मान्य केले.सदर प्रकरणी पंचनामा करण्यात आला. पंचनामा क्रमांकानुसार दोन ट्रॅक्टर, त्यामधील प्रत्येकी एक ब्रास रेती (किंमत: ५०००/- प्रत्येक) आणि दोन घमेले व फावडे (किंमत: ३००/-) असा एकूण माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ६,१०,३०० /- रुपये इतकी आहे.पोलिसांनी आरोपींवर कलम३०३ (२), ३(५) भारतीय दंड संहिता २०२३, कलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, कलम ७,९ पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच कलम ३(१)/१८१,१४६ /१९६, ५०/१७७ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाणे गोबरवाहीचे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. नागरिकांनी अवैध उत्खनन रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
Discussion about this post