सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून निलेश देशमुख यांनी नुकताच पदभार स्वीकारला यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सहायक आयुक्त पदावर काम केले. विशेष म्हणजे पदभार स्वीकारताच महापालिका क्षेत्रामधील थकीत घरपट्टीधारक मालमत्तांवर कारवाईचा बडगा हि उगारण्यास सुरुवात केली असून काल सांगली मधील एक मालमत्ता सिलं केली. २००२ सालचे नगरपालिका प्रशासन सेवेतील निलेश देशमुख हे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अंबड खामगाव येथे आपली सेवा बजावली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर नागरपालिकेमध्ये त्यांनी २०१० ते २०१६ या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा प्रभावीपणे उमटवला आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये त्यांनी सहा आयुक्त पदावर चांगले काम केले आहे निश्चितच त्यांच्या आजपर्यंतच्या कामाचा अनुभव सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रशासन कामात उपयोगी पडेल.
Discussion about this post