कुणबी समाजाने एकत्र येणे काळाची गरज बळीराज सेना अध्यक्ष अशोक वालम
राम भोस्तेकर माणगाव
कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य,कुणबी समाजोन्नती संघ,संलग्न कुणबी राजकीय संघटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ” मिशन विधानसभा निवडणूक २०२४ ” अंतर्गत जनसंवाद दौरा बळीराज सेना पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या नेतृत्वात शनिवार दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 11 वाजता समाजबांधवांच्या उपस्थितीत कुणबी भवन हॉल,निजामपूर रोड माणगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाला
यावेळी कार्यक्रमास कुणबी समाजोन्नती संघ उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक,सुरेश भायजे,सरचिटणीस प्रकाश तरल नानाडकी कुमार मोहिते महाराष्ट्र राज्य संपर्क नेते श्रावण इंगळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सुरेश भगत, सचिन कदम, महादेव भक्कम, डॉ.प्रकाश भांगरथ, सरचिटणीस संभाजी काजरेकर , रमेश मोरे, काका नवगणे, प्रकाश भोस्तेकर, समाजांचे आजी माजी पदाधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होते. जन संवाद दौरा कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी मोलाचं मार्गदर्शन केले.यावेळी माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी संबोधित करताना सांगितले की.हे सरकार निष्क्रिय आहे गेली अनेक वर्षे मुंबई गोवा महामार्गावर चे काम पूर्ण होत नाही.हे सरकार सामान्य जनतेला.वेठीस धरण्याच काम हे सरकार करत आहे.कुणबी समाज एकत्र नसल्याने चार टक्के वाले राज्यकर्ते बनले आहेत.याचे शल्य मनामध्ये असल्याचे बोलून दाखवीले .ते पुढे म्हणाले कि अशोक वालम सारखं कणखर नेतृत्व समाजाला लाभले आहे.त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपणं समाजबांधव इतर राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्रित आलें पाहिजे.बळीराज सेनेच्या या जनसंवाद कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात बळीराजाचे राज्य यावे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.
यावेळी मार्गदर्शन करताना बळीराज सेनेचे पक्षाध्यक्ष अशोक वालम म्हणाले कि, सुरवातीला आपण कुणबी जोडो अभियान सुरु केले.या अभियानाला राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याने त्यातून आपण स्फूर्ती व प्रेरणा घेऊन बळीराज सेना पक्षाची स्थापना केली. या अगोदर आपले समाज बांधव विविध पक्षांतून काम करीत होते. त्यांना आपला हक्काचा असा पक्ष नव्हता आता आपण बळीराज सेना पक्षाची स्थापना केल्याने समाज बांधवांना हक्काचा पक्ष मिळाला आहे. सन १९९० साला पासून आतापर्यंत कुणबी समाजाला विधानसभा,लोकसभेचे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. राजकीय पक्षांमुळे कुणबी समाजाची टक्केवारी जास्त असतानाही कुणबी समाजाची वाताहात झाली. आपण आपल्या समाजाची ताकद कधी विचारात घेत नाही. आपल्याला ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते पण त्यातून सामाजाचे ज्वलंत प्रश्न सुटत नाहीत.
हे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा व लोकसभेशिवाय दुसरी जागा नाही. हे पहिले आपल्याला समजले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकांत इच्छुक समाज बांधवांनी त्यांना निवडणूक लढवायची असल्यास बळीराज सेना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी तरच त्यांना आपल्या समाज बांधवांनी मदत करावी. प्रत्येक तालुक्यात,सातही जिल्ह्यात आपण पक्षाची फादर बॉडी तयार करू व त्या माध्यमांतून पुढे जाऊ. राज्यात बळीराज सेनेची स्थापना केल्यावर विविध राजकीय पक्षांचे डोळे उघडले आहेत. आपण लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेच्या काही जागांची मागणी केली आहे. त्या जागा आपल्याला न मिळाल्यास आपण आपले उमेदवार उभे करू. कोकणात येणारा प्रदूषित रिफायनरी प्रकल्प व बॉक्साइट प्रकल्प शासनाकडे बोलुन रद्द केले. कोकणात प्रकल्प आणायचे असतील तर प्रदूषण विरहित प्रकल्प आणा अशी आपली भूमिका आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वानी एकत्रित होऊन काम करूया असे आव्हान त्यांनी केले. पक्षाचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना सांगितले कि,कुणबी जोडो अभियाननंतर मिळालेला प्रतिसाद पाहून त्यावर चिंतन मनन केले. त्यानंतर समाज बांधवांना एक व्यासपीठ उभे करण्याची विनंती करण्यात आली.
त्यावरून आपण राजकीय पक्ष का स्थापना करू नये.असा विचार करून अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बळीराज सेना पक्षाची स्थापना केली. कुणबी समाज हा कोकणात बहूसंख्येने असताना आपल्याला. प्रतिनिधित्व का मिळत नाही म्हणून बळीराज सेना पक्षाची स्थापना करण्यात आली. हा पक्ष केवळ कुणबी समाजाचा नसून बहुजन समाजाचा आहे. सर्वाना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आपले समाज बांधव विविध पक्षांतून काम करताना आपली खंत आहे. आपल्याला कुठेच काम करण्यासाठी प्रतिनिधित्व मिळत नाही. हे लोक आपला वापर करून आपल्याला वाऱ्यावर सोडतात. समाजाच्या उन्नतीसाठी भविष्यात आपल्या सर्वाना एकत्रित येऊन काम करायचे आहेत. आपल्याला अशोक वालम यांच्या सारखे खंबीर व आक्रमक नेतृत्व मिळालेले आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमांतून आपल्याला समाजकरण करायचे आहे. अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना यांनी मुंबईतील विध्यार्थी वसतीगृहाचा पूर्ण विकास करण्याचा संकल्प सोडला आहे. आज आपण पाहतो फक्त सत्ता हस्तगत करणे हि आजची वस्तूस्थिती आहे. याकरिता आपली ताकद दाखविणे गरजेचे आहे.राज्यातील ६७ सांघटना कुणबी एकत्रीकरण समितीत संघटित झाले आहेत .
आता आपण आयुष्यभर समाजाचा व बळीराज सेना पक्षाचा काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले कि,कुणबी समाजाचे अनेक प्रश्न आहेत. समाजाला जातीचा दाखल मिळत नाही,कुल वहिवाट,३२ ग चे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत.मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले असून राज्यकर्ते याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत. असे चित्र पाहिल्यावर आपल्या समाजाने एकसंघ होण्याची गरज असल्याची ते म्हणाले. यावेळी कृउबा समिती माणगाव सभापती रमेश मोरे,जेष्ठ नेते सुरेश मगर,भागोजीबुवा डवले, काका नवगणे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी, रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तालुकाध्यक्ष,उपस्थित समाज बांधव यांनीहि आपले मनोगत व्यक्त केले.मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सदर जनसंवाद दौरा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा बळीराज सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्राम घेत आहेत.
Discussion about this post