लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एच. देसले हे होते तर शिक्षकवृंद व्यासपीठावरती उपस्थित होते.शिक्षिका उर्मिला चव्हाण व अलका सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत दत्त जयंती विषयी माहिती दिली. त्यानंतर विद्यालयाची इयत्ता सातवी अ ची विद्यार्थिनी अक्षरा रमेश देसले हिने गीतेच्या चौथ्या अध्यायातील १४ संस्कृत श्लोकांचं पठण केले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदानी सहकार्य केले.
सूत्रसंचालन सुनिल एखंडे यांनी केले. *फोटो ओळ-:लोहोणेर येथील जनता विद्यालयात दत्तजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना शिक्षिका उर्मिला चव्हाण, अलका सुर्यवंशी,मुख्याध्यापक आर.एच. देसले समवेत उपस्थित शिक्षकवृंद.(छाया-:सुनिल एखंडे)*
Discussion about this post