प्रतिनिधी राजकुमार पांचाळ 9657978196
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सलगरे फिजिक्स क्लासेस चे संचालक प्रा. साईकिरण गंगाधर सलगरे यांना यावर्षीचा लोकसंवाद शैक्षणिक राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक तथा ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम यांनी नुकतीच केली आहे.
श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. यंदा शुक्रवार, दि. 3 जानेवारी 2025 रोजी श्री शाहू महाराज विद्यालय, भोकर (बोरगाव रोड) भोकर येथे प्रा. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न होणार आहे. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. रामराव पाटील, आ. राजेश पवार, शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल लोकसंवाद राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार फिजिक्स विषयातील पारंगत प्रा. साईकिरण गंगाधर सलगरे हे फिजिक्स सारखा अत्यंत अवघड आणि क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना सोप्यात सोपा करून शिकवत हजारो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करत शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना फीस मध्ये 50 टक्के सवलत देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
प्रा. साईकिरण सलगरे हे भोकर तालुक्यातील रेणापूर या गावचे मुळचे रहिवाशी असुन अतिशय हालाकीच्या परीस्थितीतून त्यांनी स्वतःचे शिक्षण पुर्ण केले आहे. परंतु ग्रामिण भागाशी नाळ जोडून असलेल्या सलगरे यांनी शैक्षणिक वयात आपल्यासाठी आईवडीलांना ज्या खस्ता खाव्या लागल्या, त्या वेळी त्यांना जो त्रास झाला तो ग्रामिण भागातील विद्यार्थांना व त्यांच्या आईवडीलांना होऊ नये म्हणुन सामाजिक बांधिलकी जपत कित्येकांच्या फीसमध्ये नेहमीच विषेश सवलत देतात. आज शिक्षण क्षेत्रातील आर्थिक बाजारीच्या चढाओढीत प्रा. सलगरे सरांनी आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
संमेलन सल्लागार समितीची इंजि. मिलिंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखली झालेल्या बैठकीत वरील पुरस्कारार्थ्यांची निवड करण्यात आली असून पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक व रोख रक्कम, ग्रंथ भेट व पुष्पहार असे आहे. या समितीत देवीदास फुलारी, प्रा. धाराशिव शिराळे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. एल.जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे आदींनी निवडप्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.या पुरस्काराबद्दल प्रा. साई किरण सलगरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Discussion about this post