सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हा तीनही शहरांसाठी महत्वाचा विभाग आहे. काही काळापूर्वी सुरत शहरातील खाजगी क्लास ला लागलेल्या आगीमुळे एक विद्यार्थ्यांचा बळी गेला. त्यानंतर महापालिकेच्या या विभागाच्या सक्षमतेवर विविध चर्चा सुरु झाल्या. सद्य स्थिती मध्ये या विभागाची डोकेदुखी मनुष्यबळाची आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेची स्वप्ने पाहिली जात आहेत. तत्कालीन एकही सत्ताधारी गटाने किंवा आयुक्तांनी या विभागाच्या मनुष्यबळावर लक्ष दिले नाही हे दुर्दैव आहे. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी, अशी सर्वसाधारण रचना या विभागाची असते. मात्र सध्या ची परिस्थिती पाहता शासनाच्या नियमावलीलालही या विभागाने मागे टाकले आहे.
सात अग्निशमन बंब त्यावर मात्र ३४ कर्मचारी अशी अत्यंत कमकुवत रचना सध्या या विभागाकडे आहे. वर्तमान स्थिती मध्ये प्रशासन काळात या विभागाच्या अपेक्षा आहेत मनुष्यबळ वाढण्याच्या. सर्वसाधारण पणे एका अग्निशमन केंद्रावर एक स्टेशन ऑफिसर, तीन उप अग्निशमन अधिकारी, तीन प्रमुख अग्निशमन विमोचक, सहा वाहन यंत्र चालक, आणि एकवीस फायरमन असा तगडा ताफा आवश्यक आहे. मात्र सध्यस्थिती मध्ये अग्निशमन प्रमुख सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकारी आणि ६७ कर्मचाऱ्यांच्या जीवावर ७ अग्निशमन केंद्रे चालवली जात आहेत. एका गाडीमागे सहा कर्मचारी असे गणित घातले तर एका शिफ्ट साठी किमान ४२ कर्मचारी आवश्यक आहेत तर तीन शिफ्ट साठी हि संख्या १२६ वर जाते. यामध्येही साप्ताहिक सुट्ट्या चा विचार केला तर अधिक २० ते ३० कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या यंत्र सामुग्रीही अपुरी आहे त्यात आता महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून २३ मजल्यांच्या बांधकाम परवानग्या देण्यात येत आहेत . मात्र या विभागाकडे तितकी अत्याधुनिक यंत्रणा सक्षम नाही. तरीदेखील अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि त्यांची टीम आयुक्त शुभम गुप्तांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सक्षमपणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहे.
Discussion about this post