माकणी :
भारत शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय माकणी येथील खेळाडू रोहिणी साठे 76 किलोग्रॅम वजन गटात भटिंडा येथे होणाऱ्या 14 ते 18 डिसेंबर 2024 अखिल भारतीय आंतर -विद्यापीठ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर चे प्रतिनिधित्व करत आहे.
या बॉक्सिंग खेळाडूस महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. ए.सी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
या तिचा यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अमोल भैया मोरे, उपाध्यक्ष आश्लेष भैया मोरे, सरचिटणीस जनार्दन अण्णा साठे, चिटणीस पद्माकर हराळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.संदीप जगताप, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच धनंजय बनसोडे यांनीही या खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post