अंबड / प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) ह्या मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सखाराम घोडके यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. मात्र ग्रामसेवक यांचे तत्कालीन गट विकास अधिकारी हे आमचे पाहुणे आहेत आणि माझे काहीच होऊ शकत नाही या प्रमाणे खरोखर गट विकास अधिकारी यांनी सदरील पत्राची दखल घेतलेली दिसून येत नाही. मात्र ग्रामपंचायत अधिकारी यांचा मनमानी कारभार वाढला सर्व निर्णय त्या स्वतः घेतात, मासिक सभेला सुद्धा वेळी हजर राहात नाही व नंतर येऊन सर्व विषय त्यांच्या मर्जीनुसार प्रोसिडिंग वर नमूद करतात, मासिक सभेमध्ये मागील विषय घेत नाही, त्यामुळे यात काहीतरी घोटाळा आहे असे स्पष्ट होते, याबाबत विचारणा केली असतांना संबंधितांकडून अरेरावीची उत्तरे मिळतात.
कार्यरत असलेल्या ग्रामसेविका सौ जयश्री जनार्धन मार्कड (तांदळे) यांना गावातील नागरिकांनी आपले विकास कामे, किंवा विकास कामासंदर्भात विचारणा केली की त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मात्र सुजाण नागरिकांनी ग्रामपंचायत कारभार विषयी ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित करू नये म्हणून गावातील समाज माध्यमावर ग्रामपंचायत पाथरवाला खुर्द नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर शासकीय कर्मचारी सुरक्षा विषयक कायदे शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी करण्यात आलेले कायदे भारतीय दंड संहिता कायदे, टाकून / फॉरवर्ड करून मुद्दामहून सामान्य जनतेला घाबरवण्यासाठी व भीती दाखवून एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर करण्याचा व कर्मचारी अधिनियमाचे कुठलेही पालन न करता पदाचा गैरवापर केला असून सदर प्रकारची सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य सखाराम घोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांना लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती विचारली असता, ग्रामसेवक मार्कड यांच्या कडून स्पष्ट नकार मिळतो. प्रत्येक प्रश्न हा लेखी अर्ज करूनच विचारावा असे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. तर मासिक सभेमध्ये झालेल्या खर्चाची बिले मागणी करूनही अवलोकनासाठी सभेपुढे ठेवत नाही. ग्रामपंचायतीचा कर- वसुली भरणा बँकेत केला जात नसून तो परस्पर खर्च केला जातो. त्यानुसार आम्ही सभेच्या अजेंड्यावर जमा-खर्च नमूद करण्याची मागणी केलेली आहे. ती सुद्धा मागणी अमलात आलेली नाही तसेच तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विषयांची योग्य अशी माहिती मिळत नाही. कामापेक्षा जास्तीचा खर्च दाखवून बाकी रक्कम गहाळ केली जात आहे. या गैरकारभाररास त्वरित आळा बसावा व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सखाराम घोडके यांनी केलेली आहे.
Discussion about this post