कुरुंदवाड प्रतिनिधी/ परभणी येथे संविधानाची विटंबना केली जाते संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून माणूस मारहाण होते. आणि त्याचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू होतो हा अन्याय असून हे संशयास्पद आहे. याची खाते न्याय चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी बहुजन आणि आंबेडकरवादी संघटनांनी मागणी केली.
कुरुंदवाड शहर कडकडीत बंद ठेवून शहरातून निषेध फेरी काढली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आले. बंदच्या दरम्यान शहरातील सर्व व्यवसाय दुकाने अनेक शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद होत्या व्यापारी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळाला होता.
दोषींवर कठोर कारवाई आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पाऊले उचलावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे (उभाटाचे) जिल्हाप्रमुख वैभव उगले, सामाजिक संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामदास मधाळे, सुनील कुरुंदवाडे, दादासाहेब पाटील, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, साहिल शेख, तानाजी आलासे, अनुप मधाळे, जय कडाळे, सागर जयराम पाटील, शैलेंद्र व्होरा, अविनाश गुदले, राजू आवळे, सुरज शिंगे, शशिकांत तोबरे ,धम्मपाल ढाले, प्रफुल्ल पाटील, दीपक कांबळे ,हर्षद बागवान ,आलोक कडाळे, दिनेश कांबळे, संदीप बिरंगे, लियाकत बागवान, अभय पाठवले, उदरत भुसारी, शरद आलासे, मंतेश आवळे, चंद्रकांत कांबळे, अमोल कांबळे, संतोष शहा, आदी समाज बांधव उपस्थित होते.
Discussion about this post