प्रतिनिधी राजकुमार पांचाळ 9657978196
मौ. पाळज ता. भोकर शिवारात विजवितरण कंपणीच्या दुर्लक्षामुळे तुटून खाली पडलेल्या प्रवाही तारेचा शाँक लागून काल रात्री अंदाजे 10.00 च्या सुमारास साईनाथ राहुलवाड या सालगड्यास आपला जिव गमवावा लागला आहे.


सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बि पिकांना पाणी देतांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. विज वितरण कंपनीकडून वेळी अवेळी रात्री अपरात्री विद्युत पुरवठा देवून एका प्रकारे शेतकऱ्यांचा छळच केल्या जात आहे. पडलेल्या कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांना जिव मुठीत घेऊन आपल्या पिकांना पाणी द्यावे लागते. विंचू, सर्प, रानडुक्कर अशा जिवघेण्या प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करत शेतकरी पिकांना बाळाप्रमाणे जोपासतो. विजवितरण कंपणीतील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना होणारा हा त्रास माहीत असून देखील कंपणीने शेतकऱ्यांची क्रुर थट्टा चालवली आहे. कारखानदारांना त्यांच्या मर्जीनुसार विद्युपुरवठा करणारी कंपणी जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र विज नियोजनाचे कारण देत हेतुपुरस्सर हेळसांड करतांना दिसते.
मौ. पाळज ता. भोकर येथे या हप्त्यांमध्ये थ्रीफेज सप्लाय रात्री 10.00 ते सकाळी 07.00 असा असल्याचे समजते. त्यामुळे येथील शेतकरी मनोहर सातमवाड यांच्याकडे सालगडी म्हणून कामाला असलेले साईनाथ राहुलवाड हे विद्युत मोटार लावण्यासाठी शेताकडे जात असतांना खांबावरून तुटून पडलेली विज प्रवाहीत तार त्यांच्या पायाला अडकली. प्रवाही तारेच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना जबरदस्त शाँक लागला आणि ते जाग्यावरच गतप्राण झाले. त्यांच्या मृत्युने एक गरीब कुटूंब आज उघड्यावर आले आहे. अतिशय शांत वृत्ती असलेल्या साईनाथ यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
विज वितरण कंपणीच्या शेतकऱ्यांबध्दलच्या अशा आडमुठी धोरणामुळे तालुक्यात याआधीही अशा घटणा घडल्याच्या नोंदी असून अशा घटना किंवा अपघात होऊ नये म्हणुन उपाययोजना करण्यात याव्यात अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
Discussion about this post