सेवेन्थ डे ॲडवेंटिस्ट स्कूल कोल्हापूर यांचा सालाबाद प्रमाणे यावर्षीचा क्रीडा महोत्सव अत्यंत आनंदा मध्ये व खिलाडू वृत्तीने शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर पार पडला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गिर्यारोहक कस्तुरी सावेकर उपस्थित होत्या. प्रथमतः विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नाव कमवावे क्रीडा क्षेत्रात सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा फायदा घ्यावा यासाठी अगदी लहानपणापासूनच आपले ध्येय निश्चित करावे विद्यार्थ्यांनी खेळाप्रमाणे जीवनातही खिलाडू वृत्ती जोपासावी.
स्वागत व प्रस्तावना शाळेचे प्राचार्य टी मोहन राव यांनी केले महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, झांजपथक ,योगा, कवायत मर्दानी खेळ व पथनाट्य करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये खेळामध्ये अत्यंत खिलाडू वृत्तीने सहभाग दर्शवला यावेळी मुख्याध्यापक मनोहर कर्नाड ,विनोद आवळे खजिनदार सुहास विल्सन पर्यवेक्षक सुनील घाडगे, पर्यवेक्षिका जेनिफर लंका क्रिडा शिक्षक रुपेश सनदे, रणजित पवार त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
Discussion about this post