तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमुर :- दिनांक १८ डिसेंबर रोजी चिमुर तालुक्यातील पुयारदंड येथे श्री दत्त जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भजन मंडळीसह असंख्य महिला व पुरुष आणि बालगोपालांनी सहभाग घेतला असून श्री दत्त पालखी पुयारदंड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही थाटामाटात काढण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे पूजन व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली .
श्री दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि श्री दत्त जन्मसोहळा यांचा समावेश होता. महाआरती नंतर काल्याचे कीर्तन व गोपाळकाला तसेच दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दत्त भक्त, उपासक व उपासिकांनी मोलाचे सहकार्य केले.
Discussion about this post