नवी दिल्ली…दलित पॅंथर चळवळीतील नेते,परभणी जिल्ह्य़ाचा ढाण्या वाघ ,संविधान रक्षक लोकनेते विजय वाकोडे व संविधान रक्षक सोमनाथ सुरयवंशी यांना दिल्लीत विश्व यूवा सेंटर मध्ये आयोजित राष्ट्रीय मानव अधिकार रक्षक संमेलनात भारतातील 25 राज्यातून आलेल्या मानव अधिकार रक्षक यांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यात मानवी हक्क अभियान च्या वतीने राष्ट्रीय मंचावर विषय मांडण्यात आला व सर्वांनी संमती देण्यात आली.यावेळी लोकनेते विजय वाकोडे बाबा यांच्या जिवन चरीर्थावर प्रकाश टाकण्यात आला.याचे सूत्रसंचालन मानवी हक्क अभियानचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांनी केले.
यावेळी एक्शन एड चे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी, संदिप जी चाचरा, एक्शन एड चे भारताचे प्रमुख तनवीर काजी सर, मशकुर आलम , दीपाली मॅडम, कडूदास पप्पूराज शेळके,परभणी,मानवी राधिका चिंचोलीकर,( हिंगोली) रघुनाथ कसबे, परभणी, आझाद कामगार युनियन चे अध्यक्ष कडूदास कांबळे, आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे, अरूण जाधव ,प्रेम यादव, एकलव्य संघटनेचे शिवाजी शिवाजी ढवळे, अहमदनगर, आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे,बीड,
किरण ठाकरे,परमेश्वर माळी,समिक्षा गगविर, नागपुर,शबाना शेख, सांगली, मुनीर भाई सांगली, सह मध्य प्रदेश, उतर प्रदेश, बिहार, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीसा, तामिळनाडू, मणिपुर, हरियाना, दिल्ली, जम्मु काश्मीर, झारखंड अदी राज्यातील मानव अधिकार रक्षक उपस्थित होते..
Discussion about this post