प्रतिनिधी:- कल्याण सोन्नर
9921779668
हल्लीच्या काळात दिवसेंदिवस जंगल तोड होत चालली आहे
त्यामुळे वन्यजीव हे रस्त्यावर येत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील परीसरात सध्या बिबट्या चा वावर मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी वर्ग खुप भयभीत झाला आहे .
तसेच महावितरण कंपनीने रात्री ची लाईट सोडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
आज मौजे येल्डा ता. अंबाजोगाई येथील एक अत्यंत गरीब शेतकरी
श्री महादेव आबा धरणे यांच्या सात शेळ्यांचा फडशा पाडला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याची माहिती गावातील युवा नेते अॅड.कैलास चामणर यांनी काकांना फोन केला
घटनेची माहिती मिळताच गोरगरिबांनच्या मदतीला धावून जाणारे जेष्ठ नेते आदरणीय काकाजी यांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली आणि पंचनामा करण्यास सांगितले.
तरी या गरीब शेतकऱ्याला वनविभागाने तात्काळ मदत करावी.
Discussion about this post