
*भाऊसाहेब गुलाबराव जी पाटीलवरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे तंबाखू मुक्त युवा अभियान राबविण्यात आले.* ————————————–

भाऊसाहेब गुलाबराव जी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून *तंबाखूमुक्त युवा अभियान 2.0* हे राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना ‘तंबाखू मुक्त आरोग्य’ या विषयी प्रा. शुभांगी सोनवणे यांनी विचार मांडले.,तसेच रा से यो एककाचे स्वयंसेवक गौरव धनगर व स्वयंसेविका संगीता बाविस्कर यांनीशपथ वाचन केले अशा प्रकारे सर्व उपस्थित स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी व मान्यवरांनी*सार्वजनिक शपथ* घेतली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापिका सुप्रिया गव्हारे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका अश्विनी श्रावणे यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी श्री एस व्ही बाविस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील जवळजवळ २१५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि प सदस्य माननीय श्री प्रतापरावजी पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री विक्रमजी पाटील जीपीएस कॅम्पस चे समन्वयक मुख्याध्यापक डी डी कंखरे, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.आभार प्राध्यापक गजानन शिंदे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट झाला.
Discussion about this post