
*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे हर घर तिरंगा अभियान-२०२४ उत्साहात साजरा*

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत एक दिवसीय शिबिरात हर घर तिरंगा अभियान-२०२४ च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वंयसेवकांनी गावात प्रभात फेरी काढली. व माननीय ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म.रा. व पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांना व गावातील काही कुटुंबांना राष्ट्रीय ध्वज वितरीत करण्यात आला. व नागरिकांना या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यात आले.




तसेच गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची स्वच्छता केली. माननीय मंत्री महोदय यांनी या मोहिमेचे भरभरून कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुप्रिया गव्हारे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी संजय बावीस्कर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा .अश्विनी श्रावणे , प्रा. जयश्री पवार व इतर प्राध्यापक वृंद व महाविद्यालयीन विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वंयसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post