

📌विद्यार्थी परिषदेच्या सभेला उपस्थित प्राचार्य डॉ. देशमुख, सोबत विद्यार्थी..
कोरची : येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात सत्र २०२४-२५ साठी विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. प्राचार्य डॉ. जयदेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे समन्वयक प्रा. एस. एस. दोनाडकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
विद्यार्थी परिषदेच्या उपस्थित सदस्यांनी सभापती म्हणून बी. ए. भाग- ३ चा विद्यार्थी सुशील सहांगू नुरुटी, सचिव म्हणून बी. ए. भाग-२ ची विद्यार्थिनी भूमिका देवनारायण बेलवाती हिची सर्वानुमते निवड केली. सदस्यपदी दिव्या घोडाम, आकाश अंबादे, शालू हारामी, रिया वैष्णव,ममता पोरेटी, पोर्णिमा चोपकर, रासेयो प्रतिनिधी सुशील नुरुटी, क्रीडा प्रतिनिधी भूमिका बेलवाती, सांस्कृतिक प्रतिनिधी अश्विनी मेश्राम, प्राचार्यद्वारा नियुक्त प्रतिनिधी भूमिका बन्सोड व भाग्यश्री गोटा यांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. टी. चहारे, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एम. डब्ल्यू, रुखमोडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रदीप चापले व विद्यार्थी परिषदेचे सर्व सदस्य विद्यार्थी उपस्थित होते.
✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची
9637165828
🔖Tag: pravin D kowachi
Discussion about this post