नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत योग शिक्षक मागण्यांबाबत चर्चा
पुसद, दिनांक १९-१२-२०२४
नागपूर येथील विधान भवन येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार व इतर पदाधिकाऱ्यांनी योग शिक्षक मागण्यांबाबत गुरुवार दि. १९ डिसेंबर रोजी चर्चा केली.
महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून राज्यातील योग शिक्षक यांच्या मागण्या शासनाकडे वेळोवेळी मांडण्यात येतात. संघटनेचे संस्थापक डॉ.मनोज निलपवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य व जिल्हा कार्यकारीणीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली त्यांनी योग शिक्षकांच्या मागण्या विधिमंडळात मांडणार असल्याचे सांगितले तसेच योगशीक्षक हे ग्रामीण व शहरी भागात नागरिकांच्या आरोग्य सेवेचे महत्वपूर्ण कार्य करतात असे प्रतिपादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेल्या समितीमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार, संघटनेचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी,नागपूर विभागप्रमुख विनायक बारापत्रे, राज्य महासचिव अमित मिश्रा, आरोग्य वर्धिनी चे राज्य अध्यक्ष गजानन चौधरी,राज्य उपाध्यक्ष सुपर्णाताई पाल, राज्य उपाध्यक्ष मा.लताताई होलगरे,नागपूर जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे, महासचिव मनोहर पाल, जिल्हा कोषाध्यक्ष उषाताई हिंदारिया, जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन, योग शिक्षण समितीचे अतुल गाळेराव, राज्य सचिव सुपर्णा पाल यांचा समावेश होता, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष दिनेश भुतेकर आदीं सह अनेक योगशिक्षक, योगशीक्षिका राज्यभरातून उपस्थित होते, मुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष आभार…
Discussion about this post