नुकताच महायुती शासनाचां मंत्रिमंडळ शपविधी पार पडला. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या मंत्र्यांची यादी जाहीर केली पण दुर्दैवाने त्यात नाशिक जिल्ह्याला आणि आपले नेते डॉ राहुल आहेर यांना स्थान मिळाले नाही.
खरंतर राहुल दादांनी मंत्री पदासाठी कुठलीही मागणी केली नव्हती पण पक्षाचे शिर्षस्थ नेते व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्यात मंत्री पदासाठी आवश्यक असे सर्व गुण दिसले असतील त्यामुळेच त्यांचे नाव त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा मंत्री पदासाठी जाहीर केले.
पण तरीदेखील त्यांनी मंत्री पदासाठी राहुल दादांचे नाव घेतले नाही यामागे निश्चितच पक्षाचे काही धोरण असेल याबाबत मला खात्री आहे. त्यामुळे याबाबतीत माननीय फडणवीस साहेबांना दोष देणे चुकीचे ठरेल.
मंत्रिमंडळ विस्तार नंतर अनेक नेत्यांनी जाहीर रित्या अथवा कार्यकर्त्यांनी जाहीर पने नाराजी व्यक्त केली. अनेक जण अधिवेशन कामकाजाला हजर राहिले नाहीत.
पण राहुल दादा स्वतः त्वरित विधिमंडळ कामकाज मध्ये सहभागी झाले. व आपल्या भागातील सर्वात महत्वाच्या कांदा निर्यात शुल्क बाबत आवाज उठवला व आदरणीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
खरंतर मंत्री पद न मिळाल्याने कार्यकर्त्यांसह सर्वच जण नाराज असताना , स्वतः कुठंही नाराज न होता ज्यासाठी आपल्या जनतेने आपल्याला निवडून दिले आहे त्या कामासाठी त्वरित कामाला लागून आपल्या संयमी व कार्यक्षम स्वभावाचे आदर्श उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखून दिले.
खरंच अभिमान आहे मला आपण इतका आदर्श लोकप्रतिनिधी निवडून दिला त्याबद्दल. त्यामुळे आपण देखील कोणावर नाराज व आगपाखड न करता आपले पक्ष हिताचे कामकाज करत राहणे हेच योग्य आहे असे मला वाटते…
Discussion about this post