सोयगाव : सोयगाव शहराची पिण्याच्या पाणी पुरवठा जलवाहिनी वेताळवाडी जवळ फुटली : दररोज हजारो लिटर पाणी वाया
रस्ता गेला वाहून
नगर पंचायतीचां ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
सोयगाव
सोयगाव शहराला सुद्ध पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी वेताळवाडी कब्रस्तानच्या भिंती लगत गेल्या १५ दिवसांपासून फुटली असून नगर पंचायत सोयगावाच्या ढिसाळ कारभारामुळे दररोज हजारो लिटर पाणी सोना नदीत वाहून जात आहे.दरम्यान जलवाहिनीचे पाणी वेताळवाडी सोयगाव रस्त्यावरून वेगाने वाहत असल्याने रस्ता वाहून गेला असून कब्रतान भिंत पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोयगाव शहरास वेताळवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.वेताळवाडी जलशुद्धीकरण केंद्रापासून सोयगाव शहरातील साठवणूक टाकीकडे येणारी मुख्य जलवाहिनी वेताळवाडीच्या कब्रस्ताच्या भिंतीलगत फुटली आहे.त्यामुळे दरदिवशी हजोरो लिटर पाणी वेगाने वाहून जात आहे.या वेगवान पाण्यामुळे वेताळवाडी – सोयगाव रस्ता वाहून खड्डेमय झाला असून वाहन धारकांना वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच कब्रस्ताची भिंत पडण्याची शक्यता आहे.वेताळवाडी येथील ग्रामस्थांनी याबाबत नगर पंचायत सोयगाव यांच्याकडे तक्रार केली आहे.मात्र नहर पंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पंधरा दिवस होऊनही अद्याप जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
कोट
याप्रकरणी सोयगाव नगर पंचायत कार्यालयात शुक्रवारी मुख्याधीकारी उपलब्ध नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.
फोटो ओळ: सोयगाव – १) सोयगाव शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वेताळवाडी कब्रा स्तान भिंतीजवळ फुटल्याने वाया जात असलेले हजारो लाईट पाणी
२) मुख्य जवहिनी फुटल्याने जलमय झालेला रस्ता
Discussion about this post