शिरोली (ता. हातकणंगले )प्रतिनिधी –
राज्य मंत्री मंडळाचे दीर्घ प्रतिकक्षेत खातेवाटप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशणानंतर अखेर शनिवारी जाहीर झाले. राधानगरीचे शिवसेनेचे सलग तिसऱ्यांना निवडून आलेले आमदार प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. त्याच्याकडे सार्वजनिक आरोग्य खातेची जबाबदारी देण्यात आली.
कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंन्तर त्यांनी पहिल्यांदा आदरणीय महादेवराव महाडिकसाहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाडिकसाहेबांनी आरोग्यमंत्री मा.आबिटकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन केले व महाडिकपरिवार ha नेहमीच प्रकाश आबिटकरसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यासाठी पूर्णपणे सहकार्य करील असे अश्वासन दिले. या भेटीतून परस्पर स्नेह आणि एकतेचा सुंदर आदर्श साकारला गेला.

Discussion about this post