सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद : – माणुसकीची भिंत ही मागील नऊ वर्षापासून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या दससूत्री संदेशावर दिवस-रात्र काम करते.
माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन कडून कर्मवीर संत गाडगेबाबा यांच्या ६८ व्या पुण्यतिथी निमित्य कर्मवीर संत गाडगेबाबा स्मृति स्थळ लिंबी येथे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज व इतर मान्यवरांनी त्यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.माणुसकीची भिंतच्या पुढाकाराने पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार्डी रोड लिंबी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी,व्यसनमुक्ती,वाढता भ्रष्टाचार व शिक्षणाचे महत्त्व या ज्वलंत विषयावर सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी प्रबोधन केले. व्यसनापासून दूर राहिले तरच समाज सुधारेल असे पंकजपाल महाराज यांनी सांगितले,गावातील महिलांना साड्या,लुगडी, मुलांना व पुरुषांना थोर महापुरुषांची पुस्तके पंकजपाल महाराज यांनी दिली. या कार्यक्रमाकरिता माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यांनी व परिसरातील शुभचिंतकानी परिश्रम घेतले.
Discussion about this post