
अकोला विभाग प्रतिनिधि, गणेश वाडेकर..
21/12/2024
राज्य परिवहन महामंडळाची भरधाव एसटी बस समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळून दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोला ते खामगाव मार्गावरील अकोला नाक्या जवळ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. राज्य परिवहन महामंडळाची अकोला आगाराची एसटी बस क्र. एमएच ४० एन ९९७३ ही तेल्हारा अकोला बस अकोला कडे येत होती. तर बुलडाणा येथील दोघेजण हे अकोल्याकडून खामगावकडे जात होते. दरम्यान ही भरधाव बस अकोल्यातील बाळापूर नाक्याजवळ पोहोचताच दुचाकीवर आदळली. या घटनेत दुचाकीवरील दोघेजण अपघात होताच फेकले गेले..
Discussion about this post