सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
पुसद : राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चे पुसद विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री इंद्रनिल नाईक यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर पुसदला दहा वर्षानंतर मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे नवनियुक्त मंत्री यांचे पुसदमध्ये आगमन झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्ते व चाहते यांनी भव्य मिरवणूक काढून त्यांचे हर्षे उत्साहात जंगी स्वागत केले डिजे च्या गझरात व फटाक्याच्या अतिषबाजी करून मित्रपरिवार व चाहते यांनी त्यांचे स्वागत केले विशेष म्हणजे त्यांना अर्धा डझन खाते मिळाले असून त्यांनी तालुक्यातील जनतेचे कोणतेही काम रखडल्या जाणार नाही अशी त्यांनी या वेळी ग्वाही दिली असून शेतकरी कष्टकरी विद्यार्थी यांना काम करतांना न्याय देणाचा प्रयत्न करेल असे त्यांनी या वेळी सांगितले.
Discussion about this post