प्रतिनिधी – इचलकरंजी (ता.हातकणंगले)
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ युवासेना तालुकाप्रमुख युवानेते मा.अभिजीत लोले यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “शिवदिनदर्शिकेचे” अनावरण शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मा.श्री.संजयदादा चौगुले व युवासेना जिल्हाप्रमुख मा.श्री.शिवाजीभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना, अभिजीत लोले यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिकवणीनुसार आजपर्यंत अनेक लोकोपयोगी व समाजउपयोगी कामे केलेली आहेत, अशाच कामांच्या माध्यमातून इथून पुढे देखील त्यांच्या हातून समाजसेवा घडत राहो व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व युवासैनिकांनी तयारी लागावे अशा सर्वाना सूचना दिल्या.तसेच या “शिवदिनदर्शिका” अनावरण प्रसंगी शुभेच्छा जिल्हाप्रमुख संजयदादा चौगुले यांनी उपस्थित युवासैनिक व शिवसैनिकांना दिल्या.
शिवदिनदर्शिकेच्या अनावरण प्रसंगी युवासेना जिल्हासमन्वयक अविनाश वासुदेव, तालुकासमन्वयक पवन मेटे, इचलकरंजी शहरप्रमुख सागर जाधव, शहर समन्वयक रतन वाझे, शहरसमन्वयक संतोष लवटे, शहर समन्वयक शाहरुख मुजावर, विनायक लोकरे तसेच इतर युवासैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.

Discussion about this post