सारथी महाराष्ट्राचा
उदगीर ग्रामीण पोलीसात चार जणांविरुद्ध गुन्हा
उदगीर/प्रतिनिधी :शहरालगत असलेल्या माळेवाडी परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या जाचास कंटाळून गुरूवारच्या पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी चंद्रशेखर ज्ञानोबाराव पाटील (रा.होकर्णा ता.औराद जि.बिदर )यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मयत मुलगी शितल (वय २४)हिचा विवाह काही महिन्यापूर्वीच झाला होता.
सासरकडील आरोपी अभिषेक प्रकाश जाधव, स्वाती प्रकाश जाधव, प्रकाश गणपतराव जाधव,पूजा अभजित पाटील (सर्व रा.माळेवाडी ता.उदगीर)यांनी नवविवाहिता शितल हिला माहेराहून पैसे घेऊन ये व तुझ्या वडिलाच्या नावे असलेली अर्धी शेती नावावर करून दे म्हणून मारहाण करून,मानसिक व शारीरिक ञास दिला.जाच जुलूम करून तिच्या मरणास कारणीभूत असल्याची तक्रार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यानुसार आरोपींविरुद्ध गु.र.नं.७३३/२४ कलम ८०(२),८५,११५(२),३(५)भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.डी.केंद्रे करीत आहेत.
Discussion about this post