(.नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येण्याची चर्चा )
गजानन कदम हिवरा
देशामध्ये प्रदूषणाच्या बाबतीत महाराष्ट्रातीलच पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातीलच आठ शहर असल्याचे बोलल्या जाते महाराष्ट्रातीलच काही मोठ्या शहरांचा पहिल्या क्रमांकावर नंबर असल्याचे बोलल्या जाते आहे म्हणजेच महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते हे आपल्याला मान्यच करावे लागेल आणि यात म्हणजे महाराष्ट्रातीलच दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या आठ शहरे देशामध्ये वायू प्रदूषणाच्या बाबतीत पहिल्या दहा मध्ये आपल्या महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे हे झाले कसे एवढे मोठे वायु प्रदूषण वाढले कसे.
याचा कोणीच कधी विचार केला नाही नको नको त्या कंपन्यांना शासनाकडून परवानगी दिल्या आहेत का किंवा कंपन्यांना घालून दिलेल्या नियमाचे पालन केल्या जात नाही का ?? नियमाचे पालन करत नसतील तर ते नियमाचे पालन का करत नाही ?? तर मग कर्मचारी त्यांच्यावर कार्यवाही का करत नाहीत ? पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील राहत असलेल्या लोकांचे सुद्धा आरोग्य धोक्यात येऊ शकते हेही आपल्याला मान्यच करावे लागेल महागाव तालुक्यामध्ये महागाव सह प्रत्येक गावामध्ये किमान दोन-तीन तरी विट भट्ट्या रोड लगतच असलेल्या आपणास पहावयास मिळत आहे आणि यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते.
या बाबीकडे मात्र प्रशासनातील अधिकारांचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे गावापासून किमान काही अंतरावर वीट भट्टी असायला पाहिजे व ती गावच्या कोणत्या दिशेने असायला पाहिजे याचे काही नियम सरकारने घालून दिलेले आहेत पण या सर्व बाबीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे वीट भट्टी चालकांना मातीचा परवाना दिला जातो दिल्या गेलेल्या मातीच्या प्रवाण्यापेक्षा अधिक माती ओढल्या जाते प्रदूषण मंडळाकडील परवाना यांच्याकडे आहेत किंवा नाही याची साधी चौकशी सुद्धा महसूल अधिकारी तलाठी ग्रामसेवक करताना दिसत नाही.
आधीच मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड झाल्याने प्रदूषणात वाढ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही असेही नागरिकाकडून बोलल्या जात आहे जवळपास रोड लगतच सर्वत्र विट भट्ट्या पहावयास मिळत आहे त्यामुळे बारीक धुळीचे कण हे रोड लगत असल्यामुळे वाहन चालकांना यांचा त्रास होत असल्याचा बोलल्या जात आहे त्यापासून निघणारा धूर ज्यामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते आणि याचा समाजातील नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होतात श्वसनाचे आणि खोकल्यासारखे आजार बळवण्याचे शक्यता नाकारता येत नाही प्रदूषणाकडे शासनाने व त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने लक्ष देण्याची आज खरी गरज आहे.
पण तसे होत नसल्याचे चित्र महागावासह काळी दौ गुंज हिवरा कलगाव टेंभी भांब पोहडूळ पिपरी आमणि साहि ईजारा बोरी मुडाना परिसरात पहावयास मिळत आहे तरी संपूर्ण तालुक्यामध्ये बऱ्याच वीट भट्ट्यांना मातीचे प्ररवाने दिले जाते परंतु या मातीचा वापर विट भट्टीसाठी होत असल्याने कमी खर्चात जास्त नफा मिळत असल्याने जागोजागी वीट भट्ट्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते आहे त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे पण याकडे मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे जेवढ्या वीटभट्ट्या जास्त असतील तेवढ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढेल हे मात्र खरं आहे.
वायु प्रदूषण आटोक्यात आणले नाही तर जनतेला मात्र याचे परिणाम भोगावे लागतील हेही तेवढेच खरे आहे गावाच्या तिन्ही बाजूनी जर वीटभट्ट्यांना परवाने दिले तर त्या गावचे धुरामुळे प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात वाढेल गावातील नागरिकांवर होणाऱ्या वायू प्रदूषणाच काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून होत आहे तर वीट भट्टी परवाने देत असताना या सर्व बाबींचा विचार शासकीय अधिकाऱ्यांनी करूनच वीट भट्टी धारकांना परवाने द्यावे असे मागणी जनमानसातून काणी पडत असून जिल्हा अधिकारी साहेब यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून होणारे प्रदूषण टाळावे असे सुद्धा बोलल्या जात आहे.
Discussion about this post