महापालिका क्षेत्रामधील रस्ते आणि गटारी यांची स्वच्छता अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागातील तब्ब्ल १२०० कर्मचारी आणि निरीक्षकांच्या बदल्या नुकत्याच प्रशासनाने केल्या. काही स्वच्छता निरीक्षक कित्तेक वर्षे एकाच प्रभागात नेत्यांच्या आशीर्वादाने आपला तळ ठोकून होते. त्याचा परिणाम शहरातील प्रामुख्याने प्रभागातील स्वच्छतेवर होत होता. मात्र आता गेल्या आठवड्यापासून या बदल्यांचा परिणाम नागरिकांमध्ये जाणवत असल्याचे चित्र आहे. प्रशासनास अनेक नागरिकांनी स्वतः दूरध्वनी द्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवल्या यामध्ये अगदी प्रभागातील रस्ते सफाई असो किंवा घंटा गाड्यांची फेरी असो नागरिकांमधून बदल्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांच्या आदेशानुसार उपायुक्त वैभव साबळे यांनी आस्थापन विभागाचे देखील कामकाज अधिक गतिमान करून धडक निर्णय या बदल्यांच्या बाबत घेतले आहेत. महापालिका क्षेत्रातील एक नागरिक दिलीप गोपाळ कुंटे राहणार प्रभाग क्रमांक दोन विश्रामबाग यांनी आपल्या प्रतिक्रिये मध्ये म्हणले आहे कि, विश्रामबाग येथील हॉटेल पें प्रकाशच्या मागे एक कचराकुंडी आहे तेथे पूर्वी खूप घाण असायची परंतु अलीकडे नवनियुक्त सफाई कर्मचारी रोज नित्य नियमाने साफसफाई करतात व त्यामुळे तो परिसर खूप स्वच्छ झाला आहे एक जागरूक नागरिक या नात्याने चांगल्या कामाचे कौतुक करणे हे माझे कर्तव्य समजतो अपना मार्फत सदर सफाई कर्मचाऱ्यांचे आभार आपण सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करावे म्हणजे पुढील त्यांच्या कर्तव्यात काम करताना त्यांना उत्साह जाणवेल असे मला वाटते पुनश्च एकदा धन्यवाद” वार्ड निहाय स्वच्छता चांगल्या प्रकारे होण्यासाठी मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी बदली धोरण अवलंबले असून स्वच्छता बरोबर आता कार्यालया मधील कर्मचारी अधिकारी यांच्या बदली बाबत नियोजन करण्यात आले असून कामकाज गतिमान होण्यासाठी सदरचे घोरण निश्चित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी या वेळी येत्या नजीकच्या काळात पदोन्नती बाबत देखील निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले आहे,
Discussion about this post