


सातारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मा. खा. उदयनराजे यांना दिल्ली येथे पाठवले तर त्यांच्या आशिर्वादाने मंत्री होण्याची संधी मिळाली.राजे म्हटले राष्ट्रवादीमध्ये आमदार म्हणून काम केले परंतु त्यांनी काम करण्याची संधी दिली नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी मंत्रीपदाची संधी दिली हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली यशस्वी करायच्या आहेत. मला सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल पक्ष नेतृत्व व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. आम्ही जिल्ह्यातील दुर्गम भागातील समस्या सोडविण्यात यशस्वी होऊ असे मनोगत व्यक्त केले..
Discussion about this post