
( आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह येथे प्रतिपादन )
तुमसर:- जादूटोणा, भूत – भानामती , करणी , मंत्र – तंत्र, चेटूक ,चमत्कार ,देवी अंगात येणे, ज्योतिष्य, बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत .या प्रकारांना अशिक्षीताप्रमाणे सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात .यातून समाजात, गावागावात भांडणे निर्माण होऊन एखाद्याच्या बळी घेतला जातो .अशा घटना घडू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून गावात अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतलं पाहिजे.यातून गावकऱ्यांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून सहजतेने अंधश्रद्धेचे निर्मूलन करता येईल. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा व घटनेची चिकित्सा करा . विद्यार्थ्यांनो, जगात जादूटोणा, भूत -भानामती नाही.अंधश्रद्धा निर्मूलन हेच खरे राष्ट्रहित आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर चे तालुका संघटक प्रसिद्ध वक्ते प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले .ते आयोजित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह तुमसर येथे “अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मिलिंद तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुमसर पोलीस स्टेशन तुमसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका सहसचिव किशोर बोंद्रे, सल्लागार ऍड.रोहित बोंबार्डे, पोलीस हवालदार जयसिंग लिल्हारे उपस्थित होते.
राहुल डोंगरे म्हणाले शकुन व नवस, गंडेदोरे, ताईत ,ग्रहांचे खडे, मंत्र तंत्र, यांना सत्तेचा आधार नाही. ज्योतिष्य, हस्तरेखा शास्त्र ,विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्राचार्य राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले .कानाने चिठ्ठी वरील नावे वाचून दाखवले, जळते कापूर भक्षण करून दाखवले, लिंबूतून केस काढून दाखविले. तांदूळ भरलेला तांबे उचलून वर उचलून दाखवले वैज्ञानिक प्रयोगातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. जादुटोणा विरोधी कायदा सुद्धा प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.भंडारा जिल्ह्याचे आय.पी.एस. पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , पांडुरंग गोफणे उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर,यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कोणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही व गावागावात शांतता प्रस्थापित होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होऊन आदर्श पिढी तयार होईल असे अपेक्षित आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे व मोबाईलला दूर करावे आणि आपले ध्येय निश्चित करावे तरच यश तुमच्या हातात असेल असा आशीर्वाद यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोंद्रे यांनी केले .परमजित बेनिराम सलामे यांनी संचालन.केले.बी.पी. घाटे गृहपाल यांनी.आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय बंडू दुर्वे ,आदित्य विजय कोळवते, अनिकेत भास्कर वरकडे ,अनुप मनोहर गंगाली, श्रावण बाळाजी पारधी आदींनी सहकार्य केले..
Discussion about this post