स्थानिक यवतमाळ अमोलकचंद महाविद्यालय येथील सॉफ्टबॉल मुलांच्या संघाची सुवर्णपदकाची भरारी, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे अजिंक्यपद.
सविस्तर वृत्त असे की, यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले महाविद्यालय म्हणजे अमोलकचंद महाविद्यालय होय. या महाविद्यालयात शिक्षणासोबत अनेक खेळ खेळले जातात. त्यातील एक महत्त्वपूर्ण खेळ म्हणजे सॉफ्टबॉल होय. नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रराज्य स्तरावरील स्पर्धेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच्या प्रत्येक जिल्ह्याच्या संघाला अत्यंत मोठ्या फरकाने नमवीत, अंतिम सामन्यात पुणे च्या संघाला ५-० अशा अत्यंत मोठ्या फरकाने, होमरनणे नमवुन प्रथम क्रमांक पटकावित प्राविण्य मिळविले.
अमोलकचंद महाविद्यालयाची सॉफ्टबॉल १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने राज्यस्तरावर दीर्घ कालावधीनंतर सुवर्णपदक मिळविले.
या संघाला विजयासाठी, अमोलकचंद महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक (माजी सैनिक) संजय पंदिरवाड, सॉफ्टबॉल प्रशिक्षक भाकित मेश्राम, यांचे भरगोस सहकार्य लाभले. महाविद्यालयाचा सॉफ्टबॉल संघात कर्णधार रत्नशिल डोंगरे, उपकर्णदार सम्यक गजभिये, रोहांशु खंडारे, दक्ष रामटेके, अथर्व पाटील, रितेश जांभुळकर, देवा राऊत, बादल राठोड, हेमराज लभाने, प्रथमेश दिघाडे, युवराज पेल्लेवार, जय कोंडरे, जीवन आत्राम, प्रदीप राठोड, अर्जुन दिघाडे, कबीर सिंघानिया, इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांचे संलग्न महाराष्ट्र राज्य स्तरावरील स्पर्धेत अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ सॉफ्टबॉल संघाने प्राविण्य मिळवीत, सर्वोच्च प्रथम स्थान पटकाविले व सुवर्णपदक विजेता ठरला.
या संघात असलेल्या सर्व खेळाडूचे तसेच क्रीडा प्रशिक्षकांना महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय विजयबाबु दर्डा, संस्थेचे सचिव मा. प्रकाश चोपडा, समस्त संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. मिश्रा, उप प्राचार्य व्ही. सी. जाधव, शारीरिक क्रीडा शिक्षक किशोर तायडे, महाविद्यालयाचे समस्त प्राध्यापकवुंद तसेच महाविद्यालयातील कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या सुवर्णपदक विजेत्या संघाचे यवतमाळात आगमन होताच यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनेश बैसाणे, तसेच यवतमाळ चे तहसीलदार योगेश देशमुख यांनी चम्मू मधील समस्त खेळाडूंचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे स्वागत करून अभिनंदन केले.
सोबतच यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी मा. घनश्याम राठोड, सॉफ्टबॉल चे राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन हरणे, यवतमाळ जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सचिव डॉ. प्रा. विकास टोणे, नरेंद्र फुसे, नरेंद्र तरोणे, पंकज शेलोटकर, पियुष चांदेकर, निशांत सायरे, दीपक गजभिये, ओजस सुखदेवे, रोहित मेश्राम, आनंद भगत, रितेश मुन, विजय धुळे, नितीन रामटेके, ऍड. राहुल पाटील, सुशांत दुपारे, तसेच खेळाडूंचे आई-वडील, पालक इत्यादी क्रीडा प्रेमींनी सुद्धा सुवर्णपदक विजेत्या संघाचे अभिनंदन करीत, पुढील लक्ष गाठण्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
🙏🏼🙏🏼🙏🏼🤝
Discussion about this post