दि. २२/१२/२०२४
मा. आमदार गोपीचंद (शेठ) पडळकर यांचा झरे, ता. आटपाडी येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ कडेपुर यांच्या वतीने सरपंच सतीश देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी उपसरपंच अनिल यादव, ग्रामपंचायत सदस्य दीपक परदेशी, प्रसिद्ध व्यापारी दादासाहेब फडतरे, तसेच सहारा फाऊंडेशनचे हिम्मत मुलाणी उपस्थित होते.
या वेळी मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत, गावाच्या अडीअडचणी शासन स्तरावर सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी गावाच्या विकासासाठी भरीव पाठबळ देण्याची तयारी असल्याचेही सांगितले.
सत्कार सोहळ्यात ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या आणि गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
— ग्रामस्थ कडेपुर
Discussion about this post