प्रतिनिधी असलम शेख रत्नागिरी
पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष दैनिक क्रांतिकारी जयभीमचे संपादक, तिरंगा रक्षक चे मुख्य संपादक तथा राजकीय बादशाह या सांजदैनिकाचे कार्यकारी संपादक विश्वास बाबुराव मोहिते यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील एका शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे त्या निमित्त विश्वास मोहिते यांच्या सामाजिक राजकीय आणि पत्रकारितेतील कामकाजावर टाकलेली एक नजर….
पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,दैनिक क्रांतिकारी जयभीमचे संपादक, तिरंगा रक्षक चे मुख्य संपादक तथा राजकीय बादशाह या सांजदैनिकाचे कार्यकारी संपादक विश्वास बाबुराव मोहिते यांनी शासकीय कार्यालयात माहिती अधिकार फलक असणे बांधन कारक असताना हे फलक ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दर्शनी भागात लावलेले नाहीत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून दर्शनी भागात माहिती अधिकार फलक लावून घेतले,
तसेच भारतीय दंड संहिता हे विनापरवाना किंवा बेकायदेशीर रित्या ज्या शासकीय कार्यालयात फलक लावण्यात आलेले होते त्या कार्यालयातील फलक काढण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून काढण्यासाठी विनंती करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचे उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक विभागातील फलक अधिकाऱ्यांना सांगून असे फलक काढण्यासाठी विनंती करून ते काढण्यास भाग पाडले. अशा पद्धतीचे सामाजिक क्षेत्रातील प्रभावी काम केल्याबद्दल तसेच नव्याने दिन, दलित, पददलीत,वंचित, युवक आणि निराधार यांना संविधानाबद्दल माहिती व्हावी म्हणून नव्याने सुरू केलेल्या घर तिथे संविधान या उपक्रमाचे कौतुकही सर्वसामान्य जनतेतून करण्यात आले. अशी अनेक सामाजिक कामे मार्गी लावल्याची उदाहरणे आहेत.
विश्वास बाबुराव मोहिते यांचा जन्म पाडळी (केसे) तालुका कराड, जिल्हा सातारा या गावी 2 जून 1981 साली मातंग समाजातील अतिसामान्य कुटुंबात झाला. शेतकरी तथा शेतमजूर कुटुंबातील असल्यामुळे परिणामी त्यांना आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी म्हणजे जन्मगावी पाडळी (केसे) येथे घ्यावे लागले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पाडळी (केसे), तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी झाले. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी वर्गात प्रथम येण्याचा मान कधीही गमावला नाही. शिवाय शाळेतील आदर्श विद्यार्थी आणि शिक्षक प्रिय विद्यार्थी म्हणून परिचित. विश्वास मोहिते यांचे माध्यमिक शिक्षण श्री केदार हायस्कूल सुपने,
तालुका कराड, जिल्हा सातारा या त्यांच्या राहत्या गावापासून दोन किलोमीटर असणाऱ्या माध्यमिक शाळेत झाले. आर्थिक परिस्थिती हालकीची असल्यामुळे त्यांना सुपने या ठिकाणी जाण्यासाठी केवळ सायकल देखील उपलब्ध झाली नव्हती हे वास्तव ते आजही निसंकोच पणे सांगतात. त्यामुळे घरच्या परिस्थिती मुळे सायकल खरेदी न केल्यामुळे त्यांनी पाचवी ते दहावी सहा वर्ष दोन ते तीन किलोमीटर सतत पायी प्रवास केला. तर त्यांचे पुढील शिक्षण तालुक्याच्या म्हणजे कराड या ठिकाणी झाले.उच्च टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणाहून त्यांनी घेतले.
शालेय जीवनातच महापुरुषांचे चरित्र, महापुरुषांचे विचार आणि महापुरुषांचे यशोगाथा वाचण्याचे त्यांना वेड, त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराचा त्यांच्यावर सदैव पगडा पाहवयास मिळतो. शालेय दशेमध्येच बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे गावातील किंवा तालुका स्तरावरील कोणत्याही मुख्य सुविधा देताना प्रशासनाकडून कुचराई झाल्यास ते त्या विरोधात भूमिका घेत असत. तर शालेय शिक्षण घेत असताना ही विद्यार्थ्यांच्या समस्या आणि काय अडचणी असतील तर शाळा व्यवस्थापनाशी त्यांनी संघर्षही केल्याचे निदर्शनास आले.
आहे.शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सक्रिय समाजकार्यास सुरुवात केली. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी दलित, पददलीत, वंचित,निराधार, महिला, परितक्ता आणि दिव्यांग यांच्यासाठी असणाऱ्या शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रशासनाची चर्चा करून,निवेदन देऊन वेळप्रसंगी आंदोलने करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थानिक पातळीवरती काम करत असताना त्यांची भूमिका त्यांचा अभ्यास आणि त्यांची आक्रमकता पाहून स्थानिक पातळीवरती विविध सामाजिक मंडळांनी त्यांना विविध पदे बहाल करून समाजाची सेवा करण्याची संधी दिली.
सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तालुका,जिल्हा प्रशासनाची चर्चा करताना किंबहुना आंदोलने करताना ते कधीही डगमगले नाहीत किंवा डगमगत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्य पद्धतीचा विचार करून विविध सामाजिक संघटनांनी ही त्यांना तालुका आणि जिल्हास्तरावरती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काम करता यावे म्हणून त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी दिली. त्यांच्या कामाचा नाव नावलौकिक, हुशार,विद्वत्ता आणि अभ्यासपूर्ण भूमिका यामुळे गावातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या सदस्यपदी गेले 15 वर्षपेक्षा जास्त काळ कार्यरत केले आहें , गेल्या काही वर्षपूर्वी त्यांची अध्यक्षपदी ही त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती .त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणूनही जवळपास दोन वर्ष काम पहिले.
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना विश्वास मोहिते यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही परंतु सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना काही वरिष्ठाकडून काही अप्रत्यक्ष बंधन पडतात किंवा सामाजिक बंधने पडतात त्यामुळे 2001 ते 2002 या दरम्यान ते एका नवीन विचारपीठ किंवा व्यासपीठाच्या शोधात होते. लोकशाहीमध्ये अनन्य साधारण महत्व असणारे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारिता, त्यांची लेखणी अतिशय सुंदर अभ्यासु होती त्यामुळे त्यांनी आपण लेखनाचे वृत्त हाती घ्याव असा विचार 2003 साली केला. आपल्या हातात लेखणी असेल तर आपण समाजाचे प्रबोधन करू शकतो किंवा समाजाच्या समस्या आणि व्यथा शासनांपर्यंत पोहोचवू शकतो
, त्यासाठी लेखणी अतिशय महत्त्वाची आहे हा विचार करून त्यांनी 2003 लेखणी हाती घेतली. लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य घटकाचे दलित, पद्धतीत, वंचित,कामगार, विधवा, परितक्त्या,कामगार आणि विद्यार्थी यांचे त्या त्या काळानुरूप असणारे विषय, समस्या लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडून राज्य शासनाला जाग आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजामध्ये परिवर्तन होण्यास मदत नक्कीच झाली त्याचबरोबर समाजाच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचून बरेच प्रश्न मार्गी लागले असल्याचा चा इतिहास आहे. त्यांच्या अशा लेखणीमुळेही काही वैयक्तिक व्यक्तींचा रोषही समाजासाठी ओढावून घ्यावा लागल्याची कित्येक उदाहरणे आहेत परंतु समाज माझं घर म्हणून ते कधीही आपल्या तत्त्वाशी तडजोड करून मागे हटले नाहीत. नेहमी निर्भीड आणि निस्वार्थ लेखन करीत राहिले आहेत. परंतु आपण दुसरीकडे लिखाण करत असेल तर मात्र काही बंधन पडतात किंवा काही वेळा लेखणी उचलताना काही हात बांधल्यासारखे होतात. असेही ते लिखाण करीत असताना अनुभवण्यास मिळाले. काही वेळा दुसऱ्याच्या हाताखाली काम करताना इच्छा नसतानाही नाईलाजास्तव लेखणी थांबवावी लागते असे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे विचारपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःचे व्यासपीठ किंवा स्वतःचे विचारपीठ असावे यासाठी त्यांनी 14 ऑगस्ट 2008 साली तिरंगा रक्षक या साप्ताहिक वर्तमानपत्राची स्थापना केली. या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी कराड तालुका, सातारा जिल्हा, सह महाराष्ट्राच्या व्यथा शासनापर्यंत सातत्याने मांडत राहिले आहेत. साप्ताहिकातून लिहिताना ताज्या घडामोडी वरती विषय मांडताना काही अडचणी निर्माण होतात. आणि ज्या वेळेला एखादी बातमी किंवा एखादा विषय समाजापर्यंत तात्काळ पोहोचणे अपेक्षित असते, तोपर्यंत त्या विषयातील रस किंवा महत्त्वाचा भाग निघून गेलेला असतो असेही घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपले दैनिक वृत्तपत्र असावे म्हणजे रोजच्या घडामोडी आणि ताज्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवता येतील यासाठी तिरंगा रक्षक बरोबरच त्यांनी 2023 आली दैनिक क्रांतिकारी जयभीम, आणि राजकीय बादशाह या नावाने दैनिके सुरू केली .
त्यांचे साप्ताहिक तिरंगा रक्षक आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम, राजकीय बादशाह या वृत्तपत्रांना वाचकांनी, राजकीय मंडळींनी, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी डोक्यावर घेतलेले आहे.लिखाण हे कुणी सांगून करावयाचे नसते जे स्वतःला दिसते तेच विश्वास मोहिते निर्भीडपणे मांडतात एवढा वाचकांचा विश्वास हा मोहिते यांच्या लेखणीवर होता आणि आहें.सामाजिक भान लक्षात घेऊन आणि वृत्तपत्राचा व्यवसाय होईल किंवा नाही असा कोणताही विचार न करता बरं लिहिण्यापेक्षा खरं लिहिलं पाहिजे या विषयाने त्यांनी पत्रकारितेत सातत्य ठेवले आहे. त्यामुळे तिरंगा रक्षक,क्रांतिकारी जयभीम, राजकीय बादशाह अर्थातच विश्वास मोहिते हे वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
विश्वास मोहिते यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य केल्याबरोबरच पत्रकारिता क्षेत्रात ही एक नवा ठसा उमटवला आहे. त्यांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि पत्रकारिता अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना सत्कार करून पुरस्कार देऊन ही सन्मानित केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पहिला पुरस्कार 2010 साली हुतात्मा सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरव केला आहे, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अर्जुन चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श समाजसेवक हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विश्वास मोहिते यांचा 2011 साली सन्मान केला आहे. त्यांच्या सत्कार आणि सन्मानाची मालिका सातत्याने पुढे सुरूच राहिली आहे.
यानंतर सांगली, सातारा,कोल्हापूर,सोलापूर रत्नागिरी, पुणे या जिल्ह्याबरोबरच बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही विश्वास मोहिते यांचा सन्मान करण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने ही आदर्श पत्रकार म्हणून 2021 साली सन्मानीत केले.2023-2024 मध्ये त्यांना पत्रकार संघटनेच्या माध्यमातून घर तिथं संविधान या उपक्रमाबद्दल सन्मान करण्यात आला.महाराष्ट्रातील विविध भागाच्या कानाकोपऱ्यातून लहान मोठे पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही करण्यात आलेले आहेत. विश्वास मोहिते यांना आतापर्यंत 2005 ते 2023 या कालावधीमध्ये जवळपास 18 ते 19 पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रात ही त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय स्थापन केलेल्या भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांना निवडण्यात आले.
नुकत्याच काही दिवसापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे उत्सव समिती महाराष्ट्र राज्य या नव्याने स्थापन झालेल्या उत्सव समितीच्या ही अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बऱ्याच त्यांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. सध्या ते साप्ताहिक तिरंगा रक्षक आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम, राजकीय बादशाह या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तसेच त्यांच्या सध्या हयात असणाऱ्या मातोश्री कांताबाई बाबुराव मोहिते यांच्या नावाने आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी या नावाने संस्था स्थापन केली.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य सुरु केले.विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर नाव म्हणून विश्वास मोहिते यांची ओळख समाजात,तालुक्यात जिल्ह्यात किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात होऊ लागली आहे. नुकत्याच विश्वास मोहिते यांनी माहितीचा अधिकार हा प्रत्येक शासकीय कार्यालयात असलाच पाहिजे, आणि शासकीय कार्यालय ही जनतेची कार्यालये आहेत त्यांना बिनधास्त त्या ठिकाणी जाता यावं म्हणून ही कार्यालये आहेत परंतु काही कार्यालयात अप्रत्यक्ष भीती दाखवण्यासाठी असणारे भारतीय दंड संहिता हे फलक काढण्याबाबत ची भूमिका घेऊन सामाजिक आणि जिव्हाळ्याचा मुद्दा राज्य शासन दरबारी मांडला असून त्याची उचित कार्यवाही सुरू आहे.काही ठिकाणी कार्यवाही झाली आहे त्यामुळे त्यांचा नुकताच कराड तालुक्यात तसेच विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सत्कार आयोजित केले होते तर काही ठिकाणी होणार आहेत ,त्याबद्दल विश्वास मोहिते यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Discussion about this post