
शिरूर अनंतपाळ / प्रतिनिधी वाल्मीक सूर्यवंशी.
मौजे तळेगाव (बोरी)तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर ,येथे दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यक्रमाची रूपरेषा आशि की, दिनांक बुधवार 25 डिसेंबर पहाटे पाच वाजता होम हवन सकाळी दहा वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री प्रसाद महाराज पंढरपूरकर यांचा शुभ हस्ते करण्यात येणार आहे व तसेच कीर्तनाचा कार्यक्रम ह भ प श्री प्रसाद महाराज पंढरपूरकर यांचा दहा ते बारा वाजेपर्यंत होईल आणि त्यानंतर महाप्रसाद दुपारी बारा ते सायंकाळचे सहा पर्यंत असेल. महाप्रसादाचे अन्नदाते श्री शिवराज माधवराव एकोर्गे या सदभक्ताकडून महाप्रसादाची सेवा आयोजित करण्यात आली.
समस्त गावकरी मंडळ तळेगाव बोरी..
Discussion about this post