या झंझावाताची मध्य भारतातील पूर्वेकडील वाऱ्यांशी परस्परसंवाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर आर्दता निर्माण झाल्याने हा पाऊस होईल. परिणामी राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
26 डिसेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे तर. 27 डिसेंबरला धुळे ,नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला,अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि 28 डिसेंबर रोजी जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे..
Discussion about this post