
तालुका प्रतिनिधी : उमेश कोटकर..
शेगांव येथून जवळच असलेल्या राळेगाव लगत शेतामध्ये आज दोन पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गाव लगत शेत शिवरामध्ये वाघ आल्याने गावामध्ये तसेच शेत शिवरामध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेले शेतमजूर आपली हातातील कामे सोडून आपला पळ काढला. राळेगाव येथील तसेच परिसरातील नागरिकांनी या वाघाला पाळविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले अखेर फटाक्याची अतिशबाजी करून या वाघाला शेता शेतानी हकलावून लावले.
तेव्हा हा वाघ येथील याच परिसरातील शेत शिवारात दडी मारून बसल्याने या शेत शिवारात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करीत असलेल्या महिलांनी देखील आपला पळ काढला व गावाकडे परत आल्या व गावातील व गाव परिसरात एकच खळबळ धावा धावा वाघ आला हीच बोंब परिसरात पाहायला मिळाली..
Discussion about this post