
सारथी महाराष्ट्राचा
उदगीर/प्रतिनिधी :
महाराष्ट्र उदयगीरी महाविद्यालयातील
स्नेहा बुरपल्ले व आरती जाधव या खेळाडूंची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांच्या ॲथलेटिक्स संघात निवड झालेली आहे.भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतरविद्यापिठ ॲथलेटिक्स स्पर्धेत त्या सहभागी होणार आहेत.
भुवनेश्वर (ओडिसा) येथील कलिंग इन्स्टिटय़ूट ऑफ सोसल सायन्स येथे ता.२६ ते ३०डिंसेबर या कालावधीमध्ये अखिल भारतीय अंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे.विद्यापीठ संघात उदगीरच्या स्नेहा बुरपल्ले व आरती जाधव यांचा समावेश आहे.या दोन्ही खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा.सतिश मुंडे,रोहन ऐनाडले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्याबद्दल प्राचार्य डॉ.आर.के.मस्के,उपप्राचार्य डाॅ.एस.जी. पाटील,महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी,उपाध्यक्ष डाॅ.रेखा रेड्डी ,सचिव रामचंद्र तिरूके,सहसचिव ॲड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डाॅ.रामप्रसाद लखोटिया,कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर आदिनी अभिनंदन केले आहे..
Discussion about this post