
आजरा : प्रतिनिधी,
भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “राष्ट्रीय गणित दिन” व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेत प्राचार्य श्री आर जी कुंभार व पर्यवेक्षिका सौ व्ही.जे.शेलार त्यांचे हस्ते प्रतिमा पूजनाने संपन्न झाला.. प्रास्ताविकात सौ.व्ही.ए. वडवळेकर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी कशी लावावी. रामानुजन यांच्या गणित विषयातील योजनांची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी रामानुजन यांचा आदर्श मानून चिकित्सक वृत्ती बाळगावी असे आवाहन केले. प्राचार्य श्री आर जी कुंभार यांनीही रामानुजन यांच्या कार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित हा विषय सोपा आहे आणि यासाठी त्यांनी लक्षपूर्वक त्यातील काही क्लुप्त्या आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्राविण्य परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या प्रशालेतील इयत्ता आठवीतील 21 विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षिका सौ ए डी पाटील व श्री ए वाय चौगुले यांचाही सत्कार झाला.सूत्रसंचालन श्री पी एस गुरव यांनी केले. व्यंकटराव प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम, प्राथमिक स्टाफ, माध्यमिक स्टाफ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते..
Discussion about this post