प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली..
बुधवारी रात्री हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात पोलीस कर्मचाऱ्याने सासरवाडीत येत पत्नीवर गोळी झाडून खून केला व सासू, मेव्हणा, व अडीच वर्ष्याचा मुलगा गंभीर जखमी झाले. सदरील घटना बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली.विलास मुकाडे असे संसायित पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तॊ वसमत शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे.हिंगोली प्रगतीनगर मध्ये संशयित मुकाडे याची सासरवाडी आहे.याने पिस्तूलातून पत्नी मयूरी हिच्यावर गोळी झाडली त्यानंतर सासू वंदना धनवे व मेव्हणा योगेश, अडीच वर्ष्याचा मुलगा यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. मेव्हण्याच्या शरीरातून आरपार गोळी गेलेली आहे.सासूच्या पोटात तर मुलाच्या पायाला गोळी लागली असून तिघांना उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.संसयित आरोपी मुकाडे हा गाडीबोरी ता हिंगोली येथील रहिवासी असून तॊ 2014 ला पोलीस दलात भरती झाला होता. तॊ पोलीस मुख्यालयात ड्युटी वर होता. काही महिन्यापूर्वी त्याची बदली वसमतला झाली होती.ह्याच्याकडे पिस्तूल आले कुठून सदरील आरोपी हा कुणाचाही अंगरक्षक नसल्यामुळे त्याच्याकडे पिस्तूल असण्याचे कारण नाही. त्याने नेमके पिस्तूल आणले कुठून याचा शोध पोलीस घेत आहे.. पिस्तूल घटना स्थळवर टाऊन दिले होते. सदरील घटना पोलीस दलासाठी गंभीर आहे
Discussion about this post