दुचाकी रॅलीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लातूर : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत संसदेत संतापजनक वक्तव्य केले़ त्यांच्या वक्तव्याचा देशभरातून निषेध होत आहे़. अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे़, परंतु, केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असून आता राष्ट्रपतींनीच या प्रकरणात हस्तक्षेप करुन अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली़.
भारतरत्न डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ दि़ २४ डिसेंबर २४ रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ़. शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वात दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे यांना निवेदन देण्यात आले़.
त्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते़, येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून दुचाकी रॅलीस सुरुवात झाली़ प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, खासदार डॉ़. शिवाजी काळगे यांनी डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या विनंम्र अभिवादन केले़, दुचाकी रॅली मेन रोडने लोकमान्य टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद गेट, संविधान चौक, एक नंबर चौक, पाच नंबर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचली़ तेथे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन दिले़.
या दुचाकी रॅलीत माजी आमदार वैजनाथराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड़ किरण जाधव, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड़ बाबासाहेब गायकवाड, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड़ फारुक शेख, माजी महापौर अॅड़ दीपक सुळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रविण सूर्यवंशी, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक सहभागी झाले होते़.
Discussion about this post