सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
वैजापूर-गंगापूर मतदारसंघातील मौंजे महालगाव येथील पंचगंगा उद्योग समूह संचलित “पंचगंगा” शुगर अँड पावर प्रा.लि.साखर कारखान्याचा प्रथम गाळीत हंगामाचा भव्य शुभारंभ काल गोदावरी धाम बेट सरला पिठाधिष ह.भ.प. महंतरामगिरीजीमहाराज, प.पू गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, ह.भ.प प्रकाशनंदगिरिजी महाराज या सर्व साधू संताच्या हस्ते व खासदार मा.श्री.संदीपानजी भूमरे साहेब, कार्यसम्राट आमदारप्रारमेशपाबोरनारेसर व विठ्ठलराव लंगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. वैजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना असावा यासाठी कार्यसम्राट आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर यांनी प्रभाकरजी शिंदे यांना भेटून पुढाकार घेऊन वेळोवेळी विनंती केली व दोन वर्षापुर्वी माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या “पंचगंगा” शुगर अँड पावर प्रा.लि.साखर कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. कारखान्याचे काम पूर्ण झाल्याने सर्व शेतकऱ्यांसाठी हा सुवर्ण दिवस असल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदमय वातावरण निर्माण झाले. हा कारखाना उभा राहिल्याने तालुक्यांतील अनेक युवकांना सेक्युरीटी पासून तर अधिकारी पर्यंत काम मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याबद्दल सर्व युवकांच्या वतीने प्रभाकरजी शिंदे साहेबांचे आमदारसाहेबांनी आभार मानले.
राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून सर्वसाधुसंतांच्या हस्ते पूजन करून उसाची मुळी टाकून प्रथम गाळीत हंगामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार_साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रभाकरजी शिंदे यांचे स्वागत करून आभार मानले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा आमदार श्री.अण्णासाहेब पा माने, मा आमदार श्री.भाऊसाहेब तात्या चिकटगावकर, मा आमदार श्री.कैलास पा निकम, पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन श्री.प्रभाकर पा शिंदे, श्री कुंडलिक अण्णा माने पाटील, भावराव पा गायकवाड साहेब यांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post