सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी
वेरुळ :- जगप्रसिद्ध असलेली वेरुळ येथील कैलास लेणी येथे नाताळ ची सुट्टी व शैक्षणिक सहलीमुळे आज रोजी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महाराष्ट्र राज्याबाहेर व विदेशी पर्यटक या लेणी बघण्यास वेरूळ खुलताबाद या ठिकाणी येतात. जास्त गर्दी मुळे लेणी परिसर व मंदीर परिसरातील वाहतूक-कोडी झाली होती हि गर्दी बघता समजते कि आपले भारतीय आपला वारसा जपत आहेत आणी वेरुळ लेणी व घृष्णेश्वर मंदीर येथे शैक्षणिक सहली खुप मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत गर्दीमुळे छोटे मोठे व्यावसायीक आनंदी दिसत आहेत.
Discussion about this post