सारथी महाराष्ट्राचा (आदित्य गजरे प्रतिनीधी रावेर )
रावेर तालुक्यातील दोधे व नेहता शिवारातील हातभट्टीच्या गावठी दारूच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून एकूण 27 हजाराची दारू नष्ट केली असून दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.रावेर पोलीस ठाण्याच्या नेहेता व दोधे शिवारात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षण डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी एक पथक पाठवून कारवाई करण्याच्या सूचना डॉ जयस्वाल यांनी दिल्या. नेहेता व दोधे शिवारात गावठी हातभट्टीची दारूचे अड्डे असल्याचे पथकाला दिसून आल्याने त्यांनी दोन्ही ठिकाणचा एकूण 27 हजाराची दारू नष्ट केली आहे.
याप्रकरणी हातभट्टीवर कारवाई करून दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पहिल्या गुन्ह्यात पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून आरोपी कैलास पहानु तायडे रा. नेहते याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात बारा हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून आरोपी सुपडू भिसन तायडे रा नेहते यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस हवालदार सुभेदार तडवी, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे, महेश मोगरे, यांनी केली आहे.
Discussion about this post