लोकसभा असो वा विधानसभा निवडणूका भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशस्वी तब्बल २० वर्षे जबाबदारी पार पाडणारे उद्योजक केदार खाडिलकर यांचा सत्कार जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सन २००४ साली माजी आमदार कै संभाजी पवार यांनी हि महत्वाची जबाबदारी खाडिलकर यांच्या खांद्यावर सोपवली. महत्वाच्या पत्रकार परिषदा घेणे, नेते मंडळींचे ब्रिफींग तयार करणे पक्षाच्या निवडणुकी दरम्यान प्रचार साहित्याची निर्मिती करणे तसेच जिल्हा पातळीवर बाहेरून येणाऱ्या जेष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करणे आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या गेली २० वर्षे ते यशस्वी सांभाळत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मताधिक्क्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रचारकार्यात सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या स्वतः चा व्यवसाय सांभाळून त्यांनी या कामात विशेष लक्ष घातले आहे. गावभागामध्ये त्यांचे त्रिशूल एजन्सी हे दुकान आहे त्याचबरोबर ब्राह्मण संघाचे ते काम पाहतात. वधुवर सूचक केंद्रही ते आपल्या पत्नीसह चालवतात. सांगली शिक्षण संस्थेचे नितीन खाडिलकर हे त्यांचे बंधू आहेत. आवड असली कि सवड सहज मिळते हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे. आमच्या प्रतिनिधीनि त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि पक्षाने प्रसिद्धी प्रमुख म्हणून हि जबाबदारी मला विश्वासाने दिली ती मी तितक्याच ताकदीने पेलली जेष्ठ नेत्यांच्या विश्वासास पात्र ठरलो हि श्री गणेशाची कृपा म्हणायला लागेल. आज माझा सत्कार झाला तो माझ्यासह माझ्या सोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा देखील आहे. हे पद पक्षातील वाढत्या गर्दीत सुद्धा बिनविरोध माझ्याकडे राहिले हे महत्वाचे आहे. यापुढेही अशीच चांगली कामगिरी माझ्याकडून होत राहील.
Discussion about this post