
प्रतिनिधी प्रशांत माने नारायणगाव-वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरातील ७ हजार ५०० कुटुंबप्रमुखांना मोफत अपघाती विमा सुरक्षा कवच पॉलिसीचे वाटप व ग्रामस्थांना अग्निशमन यंत्रणेचे लोकार्पण करून विरोबा परिवाराचे संस्थापक, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमात जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंदजी ऊर्फ पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते अग्निशमन यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अपघाती विमा सुरक्षा कवच पॉलिसीचे वाटप करून व ७५ माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे होते. यावेळी ग्रामोत्रत्ती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, सरपंच डॉ. शुभदा वाव्हळ, उपसरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, माऊली खंडागळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, बिरोबा पतसंस्थेचे संचालक राजेंद्र पाटे, राजेंद्र बोरा, अनिल दिवटे, शशिकांत वाजगे, आशिष माळवदकर, ग्रामपंचायत सदस्य नंदू अडसरे, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ आदी उपस्थित होते.यावेळी पंकज महाराज गावडे, खासदार डॉ. कोल्हे, अनिल मेहेर, सरपंच डॉ. वाव्हळ यांनी पाटे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे नियोजन श्री बिरोबा परिवार व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले. हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच योगेश पाटे यांनी आभार मानले.
Discussion about this post